करमाळा प्रतिनिधी 

मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा उजनी बॅकवाॅटर परिसराच्या मध्यातून जाणारा हनुमान जन्मभूमी कुगाव ता. करमाळा ते कळाशी ता. इंदापूर पाण्यातील जोडमार्ग/पुल विकसीत करावा…. तेजस्विनी दयानंद कोकरे मा. सरपंच ग्रामपंचायत कुगाव

■ प्रस्तावीत जोडमार्गाचे/पुलाचे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील…

१) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अंतर १०० किलोमीटर कमी होणार

२) मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबई ला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणार

३) हनुमान भक्तांची मागणी असणारा मार्ग(लोणी देवकर ते कुगाव) पूर्ण होऊन हनुमान भक्तांची गैरसोय दूर होणार.

४) आवाटी परिसरात येणाऱ्या मुस्लिम बांधवांची गैरसोय दूर होणार

५) दळणवळण अंतर कमी झाल्यामुळे पेट्रोल व डिझेल ची मोठी बचत होणार

६) तरकारी मालाला पुणे, मुंबई व JNPT बंदरामुळे परकीय बाजारपेठ उपलब्ध होणार

७) ३० लाख मेट्रिक टन उसासाठी पर्यायी कारखाने उपलब्ध होणार

८) केळी निर्यातीस JNPT बंदरावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होणार (सध्या देशात सर्वाधिक केळीची निर्यात उजनी बॅकवाॅटरच्या पुर्व परिसरातून होते)

९) रोजगार निर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार

१०) उजनी बॅकवाॅटर टुरिझम ट्रॅन्गल परिसरातील पर्यटनाचा विकास होणार (भिगवण-टेंभूर्णी-करमाळा-भिगवण)

११) दर्जेदार शिक्षणाची सोय होईल

१२) आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध होणार

१३) चित्रपटाचे चित्रीकरण होणार

१५) उजनी बॅकवाॅटर परिसरातील बोटींग व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार

१६) उजनी धरणात साधारण ६०,००० कोटी+ ची वाळू आहे त्यासाठी पर्यायी रस्ता तयार होणार

१७) बलुतेदार व अलुतेदार यांच्या व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार

१८) मराठवाड्यातील व्हाॅटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल

१९) रोटी बेटी चे संबंध वाढणार

२०) मासेमारी बांधवांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार

२१) आपल्या परिसरातील जमीनीच्या किंमती प्रचंड वाढणार

२२) वाहतुकीची सोय उपलब्ध झाल्याने आपल्या परिसरात मोठ मोठे उद्योग धंदे वाढण्यास मदत मिळणार

२३) आपल्या परिसरात मुबलक पाणी साठा असल्याने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात घरे वाढणार

२४) शहरी भाग व ग्रामीण भाग अंतर कमी होण्यास मदत होणार

२५) फोटोग्राफी व्यवसायाला पर्यटकांमुळे चांगल्या पद्धतीने व्यवसाय वाढवण्याची संधी उपलब्ध होणार

२६) व्यवसाय वाढल्याने जाहिरात क्षेत्रात काम करणार्या लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होणार

२७) स्थानिक परिसरातील बेरोजगार युवकांना गावातच रोजगार निर्माण होणार

२८) पश्चिम महाराष्ट्राला जोडल्याने मराठवाड्याच्या विकासाचा वेग प्रचंड वाढणार

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *