करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याला सात महिन्यापासून तहसीलदार पद रिक्त होते. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्यावरती कामकाज चालू  होते. तालुक्यातील नागरिकांची अनेक कामे रखडली होती. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळाले पाहिजेत म्हणून  बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी 20 नोव्हेंबर रोजी तहसील

कार्यालय करमाळा समोर बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री विखे पाटील, महसूल आयुक्त पुणे, सोलापूर जिल्हाधिकारी यांना पाठवल्या होत्या. लवकरात लवकर करमाळा तालुक्याला तहसीलदार द्या  अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दिला होता. या आंदोलनाचा इफेक्ट झाला. तसेच ८ डिसेंबरर रोजी राजाभाऊ कदम यांनी सोलापूर येथे जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हा आधिकाऱ्यांना  समक्ष भेटून करमाळ्याला तहसीलदार द्या अशी मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले होते

लवकरच तहसीलदार करमाळ्याला मिळेल मी पुणे आयुक्तांना व राज्याचे मुख्य सचिवांना कळविले आहे.

आज करमाळा तालुक्याला तहसीलदार पदी शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती झालेली आहे. हे केवळ बहुजन संघर्ष सेनेच्या आंदोलनाला आलेले यश आहे. बहुजन संघर्ष सेना सदैव जनहिताच्या लढ्यात अग्रेसर असलेली संघटना आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *