
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील तहसीलदार म्हणून शिल्पा ठोकडे यांची नेमणूक झाली असून आजच त्या करमाळा तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून करमाळा तहसीलदार पद रिक्त होते. ठोकडे यांच्या नेमणुकीने तालुकावाशी यांची प्रतीक्षा संपले. यापूर्वी ठोकडे माळशिरस येथील शेती महामंडळाकडे कार्यरत होत्या. शिल्पा ठोकडे यांची लेडीज सिंघम म्हणून सोलापूर जिल्ह्याला ओळख आहे. ठोकडे यांचा जन्म कुर्डवाडी (ता.माढा) येथे झाला. बालपण व शिक्षण

कुर्डूवाडीत गेले. त्या पदवीधर झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती व त्यामध्ये त्या निवडल्या होत्या. त्यानंतर काही दिवस त्यांनी एस. पी. अशोक कामटे यांच्यासोबतही काम केले. दरम्यान त्यानंतर त्यांनी एम. पी. एस. सी. परीक्षेमध्ये परीक्षा देऊन त्या तहसीलदार पदी निवडल्या. सुरुवातीला त्या सांगोला येथे नायब तहसीलदार

म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतर कोल्हापूर येथे पुरवठा अधिकारी म्हणून तर, त्यानंतर दक्षिण सोलापूर येथे तहसीलदार म्हणून त्यांनी काम केले. दक्षिण सोलापूर येथे कार्यरत असताना वाळू माफियांवर मोठी कारवाई केली होती. अलीकडे

माळशिरस येथील शेती महामंडळाकडे त्या कार्यात होत्या. करमाळा येथे गेले सहा महिन्यांपासून तहसीलदार पदे रिक्त होते. नेमके तहसीलदार कोण येणार याकडे तालुका वासियांचे लक्ष वेधले होते. त्यात ठोकडे यांची निवड झाल्याचे तालुकास्तरीय

सर्वसामान्य वर्गातून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेले आहे.