
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने रूपाली चाकणकर यांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्र तसेच देशाच्या अनेक राज्यांमधील शेतकरी वर्ग सम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी आपल्या शेतामध्ये बळीचे पुजन करतो. पण इतिहास काळात या आपल्या बळीराजाला वामन

या आक्रमकाने कपटाने ठार मारल्याचे महात्मा फुलेंनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथात सिद्ध केले.
असे असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दि. 14 नोव्हेंबर 2023 रोजी फेसबुक या सोशल माध्यमातून बळीराजाच्या मस्तकावर वामन पाय देऊन उभे असल्याचे काल्पनिक चित्र प्रसारित करून तमाम शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारवाई

टाळण्यासाठी चाकणकर या आपल्या पदाचा गैरवापर करून दबाव टाकत आहेत. तरी प्रशासनाने रूपाली चाकणकर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन आम्हास न्याय मिळवून देण्यात यावा.
असेच कुणीही जर महापुरुषांचे वारंवार अपमान करत असतील तर ते पुढे खपवून घेतले जाणार नाहीत. नाहीतर त्याला संभाजी ब्रिगेड कडून जशास तसे उत्तर दिले जाईल.
असे संभाजी ब्रिगेड कडून तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी सुहास पोळ (तालुकाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड करमाळा ),सुनिल सावंत, अतुल निर्मळ (शहराध्यक्ष) ,बाळासाहेब झोळ (मराठा सेवा संघ तालुका कार्याध्यक्ष),मयूर रोकडे (सरपंच),सोमनाथ रोकडे (मा.तालुकाध्यक्ष ), अनिल कागदे ,अजित उपादे ,वैभव मोहिते इत्यादी उपस्थित होते.