करमाळा प्रतिनिधी 

हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरां बद्दल गरळ ओकलेल्या  मुख्यमंत्री सिद्धरामय्याच्या कर्नाटक सरकार मधील काँग्रेस पक्षाचे आमदार व कॅबीनेट मंत्री प्रियांक खरगे यांचा भाजपा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शना

खाली  काळ्या फिती लावून व घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला. पोथरे रोड वरील भा.ज.पा. युवा मोर्चा च्या संपर्क कार्यालया समोर  सायंकाळी ५ वाजता कार्यकर्ते जमले होते. यावेळी पंकज (बापू) वीर, संदीप पवार, सचिन आडसुळ,

रतन पुजारी, प्रशांत पवार, अक्षय थोरबोले, ऋषिकेश सूर्यवंशी, आकाश पडवळे, गुरुदत्त चव्हाण, प्रदीप पवार, आकाश पवार, ओंकार घोंगडे व सर्व भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *