
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप यांनी दिले. भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक पाटील मॅडम यांनी लेखी पत्र शहराध्यक्ष सुजय जगताप यांना देण्यात आले. सदर लेखी निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कार्यालयच्या आस्थापनेवरील पदे रिक्त असल्या कारणामुळे आणि करमाळा तालुक्यातील ड्रोन सर्वे चौकशीचे कामकाज सुरु असल्यामुळे सतत बाहेर जावे लागत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण लवकरच सोलापूरला

जिल्हाअधिकारी यांना भेटून त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घालून लवकरात लवकर रिक्त पदे भरण्यासाठी विनंतीही करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. तो पर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना उपस्थिती बाबत

कार्यालयीन कामकाजाबाबत सक्त सूचना दिल्या असल्याचे पाटील मॅडम यांनी सांगितले आहे. यामुळे सदरचे युवक काँग्रेसच्या माध्यमातून होणारे टाळे ठोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
