
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे विश्वकर्मा योजनेचा मेळावा शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना किरण बोकन

जिल्हा उपाध्यक्ष यांनी विश्वकर्मा योजना ही लहू उद्योग करणाऱ्या छोट्या छोट्या कलाकारांना लाभदायक आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे संबोधले. यानंतर जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यावेळी बोलताना विश्वकर्मा योजना ही

पूर्ण तालुक्यात प्रसार झाला पाहिजे व त्याचा लाभ सर्व कुशल हात मजूर कामगारांनी घेतला पाहिजे व त्यात काही अडचणी आल्यास आमच्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी पुढे बोलताना जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार म्हणाले

की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना जी राबवली आहे त्याचा कुशल कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यासाठी लाभार्थ्यांना एक लाख रुपये हे पाच टक्के व्याजदराने मिळणार आहेत. तसेच पंधरा हजार रुपये कुशल कामगारांचे

अवजारे घेण्यासाठी मिळणार आहेत व यामध्ये लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्यासाठी भत्ता देणार आहे असे शशिकांत पवार यांनी लाभार्थ्यांना माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी योजना काढतात ती शंभर टक्के गॅरंटी मोदी है तो गॅरंटी है असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे आभार व्यक्त नरेंद्र ठाकूर यांनी केले व भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब कुंभार, संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर, रघुनाथ सावंत मामा, युवराज तरंगे, कळसाईत, गणेश तळेकर, बापू तळेकर, सचिन चव्हाण, चंपावती कांबळे, भाजपा महिला मोर्चा आघाडी शहराध्यक्ष संगीता ताई नष्टे, सोशल मीडियाचे नितीन कांबळे, अभंग कुंभार, कपिल मंडलिक, संतोष कांबळे व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.