करमाळा प्रतिनिधी 

आज रयत क्रांती संघटना व पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज या विभागाला जातेगाव करमाळा टेंभुर्णी या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पडलेले असून  लोक आपला जीव मुठीत घालून ह्या रस्त्याने प्रवास करीत आहेत तरी कान

असून बहिऱ्याची भूमिका, डोळे असून आंधळा ची भूमिका घेत आहेत संबंधित अधिकारी करत आहेत. ह्या रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2023 रोजी सात कोटी इतके रुपये मंजूर केले असून तब्बल 11 महिने उशीरा चालू

केले आहे. पैसे मंजूर असून देखील संबंधित अधिकाऱ्यांनी चालू केले नाही व  ठेकेदारांनी चालू केले नाही. तरी अशा मुजोर ठेकेदारावरती तात्काळ कार्यवाही व्हावी व आम्ही काल ह्या रस्त्याने जात असताना अत्यंत निकृष्ट पद्धतीने रस्त्याचे खड्डे

बुजवले जात होते. मी उतरून संबंधित ठेकेदारांना जाब विचारला तर त्या  मुजोर ठेकेदाराची  भाषा अरेरावीची होती. डांबर न वापरता नुसती हातफोड खडी टाकून खड्डे बुजविले जात होते. तिथून जागेवरती मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

अधिकाऱ्यांना फोन केला. जगताप यांच्याशी बोललो, उबाळे यांचा फोन बंद होता, पाटील यांचा फोन लागत नव्हता, कोणीही माझ्या फोनची दखल घेतली नाही. तरी मी माझया सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंञी यांना आवाहन करत आहे की, पैसे देऊनही ठेकेदार चांगल्या पद्धतीचे काम करत नाही तरी तात्काळ या ठेकेदारला काळी यादीमध्ये टाकून ह्याचा लायसन रद्द करावं व संबंधित अधिकाऱ्यावरती फौजदारीचे गुन्हे दाखल करावे ही नम्र विनंती. अन्यथा रयत क्रांती संघटना व पक्ष रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. रयत क्रांती पक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत थोरात, रयत क्रांती पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख राजकुमार सरडे, रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, शिवशंकर जगदाळे, अजय बागल, राजेंद्र ननवरे, संतोष निंबाळकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *