करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील बेकायदेशीर दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहेत ते बंद व्हावेत म्हणून २८/११/२०२३ पासून आमरण उपोषण तहसिल कार्यालयासमोर करमाळा येथे करणार आहे.

करमाळा तालुक्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करमाळा तालुक्यातील सर्व सामान्य माझ्यासारख्या असंख्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाला न्याय देण्या ऐवजी करमाळा तालुक्यातील बेकायदेशीर मटका, झुगार, दारु हातभट्टी, बेकायदेशीर धाब्यावर दारु विक्री, झुगार, मटका, हातभट्टीदारु व महिलेवर होत असलेल्या अन्यायाला न्याय न देता तडजोड

करून मिटवतात ही करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावात दोन तीन बेकायदेशीर धंदे चालू असून बेकायदेशीर वाळू हि मोठया प्रमाणात चालू असून वाळू माफियाकडून हप्ते घेत असल्यामुळे कारवाई करत नाहीत. त्यांचे हप्ते पोलिसांना ही असल्याने खुलेआम बेकायदेशीर दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहेत. त्यामुळे २८/११/२०२३ रोजी शहाजी जगन्नाथ ठोसर व देविदास रगुनाथ कांबळे हे आमरण उपोषणाला बसत आहे.

पोलिसाच्या विरोधात तक्रार दिल्यामुळे आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे त्याला जबाबदार पोलिस राहतील. असा अर्ज शहाजी जगन्नाथ ठोसर, देविदास रगुनाथ कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) व जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय यांना केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *