करमाळा प्रतिनिधी

खो-खो मध्ये विद्यार्थीनीनीं  मिळविलेल्या यशाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे कौतुक सन्मान सोहळा  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेज येथे दिनांक २४/११/२०२३ वार-शुक्रवार रोजी आयोजित केलेला असून या सन्मान सोहळ्यास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती शाळा व्यवस्थापन समिती ने केली आहे. 

मॉडर्न खो-खो असोसिएशन  सातारा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेजने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. त्यातून महाराष्ट्र व नॉर्थ महाराष्ट्र या दोन संघाची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र संघातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेज  शाळेतील सायली दादासो भोसले व स्नेहल ईश्वर भोसले या दोन विद्यार्थिनींची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

       तसेच नॉर्थ महाराष्ट्र संघातून श्रावणी भाऊसाहेब कन्हेरे व अनुष्का उमेश थोरे, स्नेहल शिंदे व सिद्धी काळे या मुलींची निवड झाली आहे.

         या सर्वांना मार्गदर्शन करणारे  शाळेतील क्रीडा शिक्षक शहाबुद्दीन मुलाणी सर, मुख्याध्यापिका अंजली निमगिरे मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे..शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कादगे, आण्णासाहेब साळुंखे, विकास कन्हेरे गुरुजी, रणजीत कादगे, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी या यशाबद्दल सर्वांचे  अभिनंदन केले. ग्रामीण भागातील शाळेने मिळविलेल्या यशाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. या कौतुक सन्मान सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती शाळा समिती कमिटी ने केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *