जेआरडी माझा 

वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी पक्षाची संयुक्त बैठक माळशिरस तालुका झाली. बैठकीचे नियोजन माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी केले होते. बैठकीत मुंबई येथे होणाऱ्या 25 नोव्हेंबर 2023 रोजी शिवाजी पार्क येथे श्रद्धेय अॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या संविधान संरक्षण वाचवा

महरँलीच्या महा सभेची तयारी सोलापूर जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित राहण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पाडत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माळशिरस तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा युवा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केले. जिल्हा

कोषाध्यक्ष अभिमान जगताप, तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन सरवदे, युवा तालुकाध्यक्ष दर्शन सुरवसे, करमाळा तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, महासचिव विकास दळवी, उमेश जगताप, सुरेश मोटे, आरिफ शेख, सचिन

माने, अनेक तालुक्यातील  आजी माजी कार्यकर्ते अॅड.बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे आंबेडकर प्रेमी यांच्या शेकडोंच्या उपस्थित यशवंत आंबेडकर बुद्ध विहार, माळीनगर,  माळशिरस,येथे मीटिंग बैठक पार पडली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *