करमाळा प्रतिनिधी

रमेश कांबळेचा बोलवता धनी धनंजय डोंगरे!!!

आदिनाथ कारखान्याची भंगार विकले ही बातमी धंधादात खोटी

सिद्ध झाल्यास संचालक पदाचा राजीनामा देऊ – यांचा संयुक्तिक दावा

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर 2005 पूर्वी ज्या वाहतूकदारांनी कारखान्याचे पैसे थकवले आहेत अशांची वाहने आणून जप्त केली होती. या वाहन मालकांना मागील संचालक मंडळाच्या काळात अनेक वेळा कायदेशीर नोटीस देऊन कारखान्याची थकबाकी भरा व वाहने घेऊन जावा असे कायदेशीर रित्या बजावले होते. गेली अठरा वर्षात वाहन मालकांनी थकबाकी एक रुपया भरला नाही. कारखान्याचे वतीने भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कारखान्यातील सर्व भंगार विकण्यासाठी तयार करण्यात आले. याची किंमत ठरवण्यासाठी एक एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.

या एजन्सीने किंमत निश्चित केल्यानंतर याचा जाहीर निलाव होणार आहे व या भंगार विक्रीतून कर्मचाऱ्यांचा एक पगार करण्याचे प्रशासकीय संचालकाची नियोजन आहे. कारखान्यातून भंगारात एक गजाचा तुकडा सुद्धा आत्तापर्यंत विकलेला नाही, हे सिद्ध झाले तर आम्ही संचालक पदाचा राजीनामा देऊ. आदिनाथ चे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या कारखान्यात केला आहे याची चौकशी प्रशासकीय मंडळाने सुरू केली आहे. यामुळे वैफल्यग्रस्त झालेले धनंजय डोंगरे आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अत्यंत प्रामाणिक सभासद व कधीही आर्थिक तडजोड न करणारे

संचालक रमेश कांबळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भ्रष्टाचाराच्या आरोप करत आहेत. धनंजय डोंगरे यांच्या काळात आदिनाथ कारखान्याची वीज बिल 82 लाख रुपये थकले आहे. आदिनाथ कारखाना सुरू होऊ नये या दृष्टीतून आदिनाथ कारखाना चोरून लाईट घेतो अशी तक्रार आपल्या हस्तका कडून करून आदिनाथची विज तोडण्याचे पाप धनंजय डोंगरे यांनी केले आहे. यामुळे नाईलाजानं आदिनाथ ची इतर कामे डिझेल जनरेटर सुरू करून करावी लागत आहेत. यात कारखान्याला रोज वीस हजार रुपये डिझेल लागत आहे. शिखर बँकेने जप्त केलेली दोन लाख 28 हजार क्विंटल साखर अहमदनगर येथील कोटेच्या या एकाच व्यापाऱ्याला संशयस्पद व्यवहार करून 2910 ते 2980 रुपये प्रति क्विंटल दराने विकली आहे. यावेळी साखरेची दर 3400 प्रतिक्विंटल होते. आदिनाथ ची साखर तीन वर्षे जुनी असल्यामुळे किमान 3100 रुपये क्विंटलने विकणे गरजेचे असताना जवळपास दीडशे रुपये, दोनशे रुपये कमी दराने साखर विक्री केली. साखर शिखर बँकेच्या ताब्यात असताना विक्री करताना सुद्धा टेंडरला स्वतः धनंजय डोंगरे उपस्थित होते. त्यांच्या मध्यस्थीने हा सगळा व्यवहार झालेला. याला साक्षीदार कार्यकारी संचालक अरुण बागनवर आहेत. या व्यवहारात जवळपास चार कोटी रुपयांची आर्थिक नुकसान करून स्वतःचे प्रपंच मोठे केले आहे. त्याचप्रमाणे 2018-19 मध्ये आदिनाथ कारखान्यात साखर शिल्लक नसताना ही साखर निर्यात केली असे दाखवून केंद्र सरकारचे 3 कोटी 38 लाख रुपये अनुदान उचले व हे अनुदान काही ठराविक पाच व्यापारी व धनंजय डोंगरे यांनी वाटून घेतले आहे. हे अनुदान परत करा असा आदेश केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाने पाठवला आहे. या अनुदानातील 2 कोटी 90 लाख रुपये व्यापाऱ्यांमध्ये वाटून घेतले व 42 लाख रुपये मकाई कारखान्याला दिले आहेत. चेअरमन पदाच्या काळात वाहन भत्ता व इतर खर्च म्हणून दर महिना एक ते दीड लाख रुपये कारखान्यातून उचल केली आहे. अशा एक नव्हे तर अनेक धनंजय डोंगरे यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणी बाहेर काढण्याचा निर्णय प्रशासकीय संचालक म्हणून घेतल्यामुळे धनंजय डोंगरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे रमेश कांबळे सारख्या प्रामाणिक इमानदार व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय डोंगरे गोळ्या मारत आहेत. डोंगरे यांनी हिंमत असेल तर सर्व पत्रकारां समक्ष आमच्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत.

……

धनंजय डोंगरे सारख्या भ्रष्टाचारी माणसांना नेतृत्व दिल्यामुळे बागल गट तालुक्यातून रसातळावा जात आहे. याची दखल रश्मी बागल यांनी घ्यावी व चांगल्या प्रामाणिक व्यक्तींना बागल गटात काम करण्याची संधी द्यावी असा सल्ला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी दिला आहे.

……

धनंजय डोंगरे यांच्या काळात कारखान्यातून स्टोर मधून दोनदा चोरी झाली. या चोरीत कोण सहभागी होते हे तालुक्याला माहित आहे पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यावेळी अशीच पोट तिडकीने धनंजय डोंगरे परचेस मधील स्टोर मधील गोडाऊनची चोरी केलेल्या गुन्हेगारांची नावे माहीत आहेत. ते ती नावे पोलिसांना का देत नाहीत असा सवाल ही संजय गुटाळ यांनी केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *