
करमाळा प्रतिनिधी
मा. ज़िल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी प्रा आ केंद्र जेऊर येथे भेट दिली. राष्ट्रीय किटाकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप, डेंगू, चिकन गुनिया, ई. आजारा विषयी माहिती दिली व

मार्गदर्शन केले. यावेळी प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कानडे व जेऊर ग्रामपंचायत नवनिर्वचित सदस्य विनोद गरड, सचिन निमगिरे, इकबाल पठाण, नाना मोहिते यांनी चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी आबासाहेब झिंजाडे, मनोज पद्माळे, नवनाथ शिंदे, प्रशांत टोणे उपस्थित होते. चव्हाण यांनी कीटकजन्य रोगांवर नियंत्रण करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले.

