
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील किल्ला विभागातील लोकमान्य टिळक येथील झाडाची फांदी तुटून विजेच्या तारा तुटल्या आहेत याबाबत करमाळा नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे.

लोकमान्य टिळक परिसरात लहान मुले व वृद्ध नागरिक बसत असतात. झाडाची फांदी तुटल्यामुळे तेथील विजेचे तारा तुटून पडल्या आहेत. त्या वेळेस तेथे एकच व्यक्ती बसले होते. जास्त व्यक्ती नसल्याने दुर्घटना टळली आहे. त्या परिसरात येणाऱ्या

जाणारी नागरिक खूप मोठ्या प्रमाणात असतात. परंतु नगरपालिकेला सांगूनही येथील दुरुस्ती न केल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तरी त्वरित नगर परिषद विज विभाग व कर्मचाऱ्यांनी तेथील परिसर स्वच्छ व्यवस्थित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
