
कार्यकर्त्यांची नस ओळखणारा नेता म्हणजे प्रमोद महाजन – घोरपडे
करमाळा प्रतिनिधी
आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर दौरे करून संघटन मजबूत करण्याचे काम माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांनी केले असे मत त्यांच्या जयंतीनिमित्त भा.ज.पा. करमाळा माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रतिमेचे पूजन पत्रकार अशप्पाक सय्यद व पत्रकार आलिम शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.. यावेळी भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, सहकार आघाडी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, संजय गांधी योजनेचे नरेंद्र सिंह ठाकुर, सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, संतोष कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, विनायक कांबळे आदि जण उपस्थित होते.

पुढे बोलताना घोरपडे म्हणाले की, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाल संपूर्ण देशाने पाहिला त्यांच्या खांद्याला खांदा लावून निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमोद नेहमीच त्यांच्यासमवेत होते. तसेच महाराष्ट्र मध्ये मुंडे, महाजन यांच्या जोडीने शिवसेनेबरोबर युती करून महाराष्ट्र मध्ये सत्तेत राहून अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेण्यामध्ये महाजन साहेबांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेना-भा.ज.प. युतीचे खऱ्या अर्थाने ते शिल्पकार होते. पार्टीची विचारधारा वाढवण्यामध्ये संघटन मजबूत करण्यामध्ये आजचं भा.ज.प. जो दिसत आहे खऱ्या अर्थाने त्यांचे कष्ट मेहनत दिसून येते.
