
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाद्वारे साधला देशवासीयाशी संवाद
करमाळा प्रतिनिधी
2 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे आयोजित केलेल्या खादी महोत्सवाला उस्फूर्तपणे प्रतिसाद भेटला, सुमारे एका दिवसात दीड कोटी रुपयांची खादी विक्री झाली, यामधून देशवासीय खादीला प्राधान्य देत आहेत असे संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केले.

आज पिंपळवाडी परिसरामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी संयोजक भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, करमाळा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर, राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे संचालक शिवनाथ घोलप, मनोज जाधव आदी जण उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की दहा वर्षांपूर्वी खादी प्रॉडक्टची विक्री तीस हजार कोटी पर्यंत होती परंतु आता देशवासीयांनी प्रोत्साहन दिल्यामुळे सरासरी सव्वा लाख कोटी पर्यंत विक्री वाढलेली आहे यामध्ये ग्रामीण तसेच शहरातील वेग वेगळ्या नागरिकांचा सहभाग आहे. त्याचबरोबर कुटीर उद्योगी, हस्तशिल्पी, कारागीर, आयुर्वेदिक वृक्ष लागवडी वाले, विणकर, शेतकरी यांचा यामुळे लाभ झालेला आहे. लोकल फॉर वोकल हे अभियान यशस्वी होताना दिसत आहे. तसेच भारतीय जनतेने पर्यटनला जाताना तेथील स्थानिक उत्पादकाकडून तयार केलेल्या वस्तूच खरेदी करा असे यावेळी त्यांनी आवाहन केले.

खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर होत आहे या गोष्टीचा मला आनंद वाटत आहे. तसेच यावेळी 31 ऑक्टोबर सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे स्मरण केले व त्यांनी या आदर्श महापुरुषामुळे देशातील 580 राजे – राजवाडे देशामध्ये एकसंध राहिले सामील झाले अशा तसेच त्यांच्या जयंतीच्या औचित्य साधून मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावातून जमा केलेली माती दिल्लीमध्ये अमृत कलश च्या माध्यमातून येत असून त्याचे रूपांतर अमृता वाटिका मध्ये होणार आहे तसेच 31 ऑक्टोबर रोजी मेरा युवा भारत हे राष्ट्रव्यापी संघटन याची घोषणा होणार असून युवकांच्या विविध कलागुणांना यामुळे वाव मिळणार आहे. याबाबत त्यांनी वेबसाईट MY Bharat.Gov.in जाहीर केली.

तसेच 31 ऑक्टोबर हे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले तसेच तमिळनाडू येथील प्रसिद्ध लेखिका शिवशंकर जे यांच्या साहित्य रूपामुळे देशाला एकसंध जोडण्याचा प्रयत्न दिसून येतो त्यांनी 18 भारतीय भाषांमध्ये अनुदान केलेला आहे. यासाठी त्या सोळा वर्षापासून काम करीत आहेत तसेच कन्याकुमारी येथील ए .के .पेरुमल यांचा टेम्पल रिसर्च तसेच गाव गावातील प्राकृतिक घटकांची जोडलेल्या कथेद्वारे 100 पुस्तकांमधून संस्कृतीचे दर्शन घेतलेले आहे.
भगवान बिरसा मुंडा यांचा जयंती 15 नोव्हेंबर यानिमित्त त्यांनी त्यांना अभिवादन केले .आदिवासी बांधवांनी नेहमी प्रकृतीची नातं कसं टिकवंवाव हा संदेश आपल्याला दिलेला आहे. नुकतेच पार पडलेल्या पेरा एशियन गेम मध्ये 111 मेडल विजेत्या सर्वांचे अभिनंदन केले… तसेच गुजरात मधील अंबाजी मंदिर येथील गब्बर पर्वत येथे योगमुद्राचे वेगवेगळे शिल्प निदर्शनास येतात यामध्ये स्क्रॅप पासून हे सर्व शिल्प बनवले आहेत अशाच प्रकारे अनेक कारागिरांना यामधून प्रेरणा मिळणार आहे..