सततच्या पाऊस अनुदानातून वंजारवाडी यादी अपलोड न केल्याने आमरण उपोषणाचा ग्रामस्थाचा इशारा

करमाळा प्रतिनिधी

ऑक्टोबर 2022 मध्ये करमाळा तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासन करून तब्बल एक वर्षानंतर याद्या ऑनलाईन अपलोड करून करमाळा तालुक्यातील सात कोटी पेक्षा जास्त अनुदान वितरित केले आहे. परंतु सदर याद्या अपलोड करताना करमाळा तहसील प्रशासनाने वंजारवाडी येथील कृषी सहाय्यक यांनी पंचनामे

केलेली यादी ऑनलाईन अपलोड केली नाही. प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे वंजारवाडी मधील सर्व बाधित शेतकऱ्यांना पंचनामे झाले असताना सुद्धा व ते अनुदान मिळण्यास पात्र असताना सुद्धा केवळ प्रशासनाच्या ढिसाळ व निष्काळजीपणामुळे वंजारवाडीतील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता असताना सुद्धा शासन अनुदान देऊ करत असतानाही केवळ आणि केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून दोन दिवसात महसूल

प्रशासनाने कार्यवाही करून अनुदान वितरित न केल्यास शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर वंजारवाडी मधील सर्व शेतकरी महिला व मुल व जनावरासमवेत करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. अशा प्रकारचा इशारा वंजारवाडी मधील शेतकरी माऊली बिनवडे, अनिल बिनवडे, निलेश राख, संतोष बिनवडे, भुजंग गीते, अंबादास बिनवडे, सुभाष बिनवडे, दत्तात्रय बिनवडे, राजाराम बिनवडे, वैभव केकान व वंजारवाडी तील सर्व ग्रामस्थ यांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *