भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी दिली के.के लाइफ़स्टाईलला सदिच्छा भेट ……

करमाळा प्रतिनिधी 

करमाळा येथिल कपड्याच्या शोरूमचे मालक असलेल्या बलदोटा परिवाराचे व्याही असलेले आ.प्रशांत बंब यांची मूलगी ममता व राजेंद्र पीपाड़ा राहाता ( शिर्डी ) यांची सून आहे. काही अड़चणीमूळे आ.प्रशांत बंब हे के.के लाइफ़स्टाईलच्या उदघाटन दिवशी येऊ शकले नव्हते त्यामूळे त्यांनी आज बलदोटा परिवाराची भेट घेऊन त्यांच्या नवीन शोरूमला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यानंतर मा. नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर, सुनील लुनिया यांनी श्री. गुरुगणेश गोपालन संस्था, जैन श्रावक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्रेणीकशेठ खाटेर यांनी आ. प्रशांत बंब हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे नेतृत्व असून त्यांनी करोना काळात लोंकाची केलेली

सेवा कधीही विसरता येणार नाही त्यामुळे त्यांना  जनतेची व समाजाची सेवा करण्याची भरपूर संधी मिळावी असे सांगून त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ. प्रशांत बंब यांचे सोबत डॉ. राजेंद्र पिपाडा, मा. नगराध्यक्ष ममता पिपाडा, बन्सीलाल बंब, महावीर पिपाडा हे उपस्थित होते. या सर्वांचा बलदोटा परिवाराकडून यथोचित सत्कार करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *