
करमाळा प्रतिनिधी
आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती करमाळ्यामध्ये कान्नाड गल्ली येथे उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी प्रतिमेचे पूजन करून जयंतीला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व महादेव कोळी समाज बांधव व कान्नाड गल्लीतील रहिवासी व मित्रमंडळी, वाल्मिकी मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रतिमा पूजनाला व प्रतिमे वंदनाला

उपस्थित होते व त्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर धनंजय किरवे यांच्यातर्फे मूक बधिर शाळेमध्ये जेवण वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वाल्मिकी मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी

आयोजन केले होते. वाल्मिकी चौकात व परिसरात सर्व वाल्मिकीमय वातावरण झाले होते. अशा रीतीने वाल्मिकी जयंती उत्साहात पार पाडण्यात आली. यासाठी सर्व समाज बांधव व वाल्मिकी मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. जयंती उत्साहामध्ये सचिन भाऊ घोलप, सौरभ माने, सूर्यकांत घाडगे, प्रशांत माने, कुमार माने, मनोज राखुंडे, सोमनाथ साने, प्रदीप

माने, शाम घाडगे, आकाश साने, अजय साने, अक्षय घाडगे, नयन साने, परशुराम माने, सागर राखुंडे, आश्रोबा माने, आलोक माने,रुद्रांश माने,ऋतुराज माने,रुद्रेश माने,कृष्णा अभंगराव, रोहन माने, प्रथमेश माने, मयूर माने, अविनाश घाडगे, रियाज पठाण, सुनील साने, कृष्णा कोळी (मांगी), सुधीर कांबळे (मांगी), नारायण कोळी (झरे), संतोष घोरपडे (कुंभेज), बाळासाहेब कोळी (वीट), शिवाजी माने (तरडगाव), अरुण माने (तरडगाव), बाळासाहेब माने (तरडगाव), महेश घाडगे, दिनेश माने,उमेश माने, आतिश माने, आयोग पठाण, निलेश माने, सुहास माने, गणेश माने यांनी उपस्थितीचे शेवट आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.