करमाळा तालुका व शहरातील बऱ्याचशा रेशन धारकांना रेशनवरील धान्य मिळत नाही 

करमाळा प्रतिनिधी 

करमाळा तालुका व शहरातील बऱ्याचशा रेशन धारकांना रेशनवरील धान्य मिळत नसून, त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले नाही. सदर बाबत स्वस्त धान्य दुकानदारांकडे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी रेशनकार्डधारकांनी सर्व कागदपत्रे दिली असूनसुद्धा त्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी न करता त्या मालाची जास्त दराने विक्री केली करण्याचे प्रकार होत

आहेत. सध्या महागाईने कंबरडे मोडले असता, स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार करुन अधिकाऱ्यांना हताशी धरुन रेशन धारकांना तुमचे रेशन ऑनलाईन झालेले नाही, तुमचे धान्य आलेलेच नाही अशा प्रकारची उत्तरे देतात. 

सदर बाबीची तक्रार पुस्तिका मागणी केल्यास ते तक्रार पुस्तिकादेखील देत नाहीत. या गोष्टींची सखोल चौकशी करुन संबंधित असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना रद्द करावा. त्याचबरोबर सदर रेशन दुकानदारांना ऑनलाईन पद्धतीने सर्व रेशनधारकांची नोंदणी करुन घेण्यास आदेशित करावे. 2015 च्या नंतरचे देखील रेशनकार्डधारकांना सरसकट धान्य

मिळण्यासाठी नोंदी घेण्यात याव्यात. अन्यथा ये त्या आठ दिवसांत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करमाळा तहसिल याठिकाणी उपोषण करेल. असा इशारा दिला. निवेदनात दिला यावेळी उपस्थित सह्या केल्या. तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, शहर अध्यक्ष, गणेश कांबळे, महासचिव रामा भाऊ कांबळे, उपाध्यक्ष साधू चौथमहाल, तालुका संघटक महावीर पोळ, सचिव विश्वराज आल्हाट, ऋतीक लोंढे, लहू भालेराव, मुन्ना पतंगे, पिंटू रोंगे. अनेक पक्षाचे कार्यकर्ते  उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *