
भाजपा नेते गणेश (भाऊ) चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव श्री येथे कीर्तन मोहत्सवाची आजपासून सुरवात
करमाळा प्रतिनिधी
करमाळा – भारतीय जनता पार्टीचे नेते,जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश (भाऊ )चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव श्री येथे कीर्तन मोहत्सव आजपासून सुरु झाला आहे. यामध्ये कलशपूजन,

दीपाप्रज्वलन,विनापूजन, प्रतिमापूजन,मृदूंगपूजन-टाळ पूजन आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व मोहोत्सवाची सुरवात करण्यात आली. आज गुरुवार दि,२६ रोजी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प किर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे – गेवराई, शुक्रवार दि २७ रोजी ह.भ.प भागवताचार्य संदीप महाराज खंडागळे -पैठण, शनिवार दि,२८ रोजी ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील- बुलढाणा, रविवार दि,२९ रोजी ह.भ.प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख

इंदोरीकर व सोमवार दि,३० रोजी ह.भ.प महंत विठ्ठल महाराज शास्त्री- गहीनाथगड यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. याशिवाय दररोज प्रवचन, शिवामृत ग्रंथ पारायण करण्यात येणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन बिटरगाव श्री चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.
