करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या आई कमला भवानी नवरात्र उत्सव पूर्ण भक्तिमय भक्ती भावाने साजरा झाला. कमला भवानीच्या नवरात्र उत्सवाला राज्यातून परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. या उत्सवाला करमाळा शहर व तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव विशेषता कमलाभवानी मंदिरात दर्शनासाठी येत होते. सोलापूर जिल्हा व शहर व करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातून भाविक भक्त उपस्थित होते. करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी अन्नदान करून हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन नवरात्र काळात घडून आणले.

तसेच जगदंबा देवी अन्नछत्र व महाप्रसाद मंडळ यांच्या वतीने भाविक भक्तांना नऊ दिवस मोफत महाप्रसाद वाटप करण्यात आले.

करमाळा शहर व तालुक्यातील भाविक भक्तांनी जगदंबा देवी अन्नछत्र मंडळाला देणगी रुपी व वस्तुरूपी सहकार्य केले.

राजेराव रंभा तरुण मंडळाच्या वतीने कमलाई फेस्टिवल व डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा मुख्य आकर्षण होते. पर जिल्ह्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने कमलाई फेस्टिवल मध्ये स्पर्धेत भाग घेतला होता.

बाहेर गावावरून परराज्यातून आलेले वेगवेगळे दुकानदार, खेळणी स्टॉल वाले, पाळणे, झुला वाले, सर्व ठोक व किरकोळ विक्रेते, व्यापारी बंधू व खाद्यपदार्थ विक्री स्टॉल यांनी येऊन नवरात्र उत्सवाची शोभा वाढवली. श्री देवीचामाळ ग्रामपंचायत च्या वतीने त्यांची सर्व सोयी नियुक्त सुविधा करण्यात आलेल्या होत्या. या उत्सवासाठी येणाऱ्या सर्व व्यापारी बंधू, खाद्य विक्रेते, खेळणी स्टॉल धारक यांचे असेच सहकार्य करून दर नवरात्र उत्सवाला येऊन यात्रेची शोभा वाढवावी.

विशेषता: कमला भवानी नवरात्र उत्सवात पाळणे, झुला मुख्य आकर्षण होते. याचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची विशेष गर्दी पहावयास मिळाली. तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. व वीज वितरण कंपनीने करमाळा नगरपालिका सर्व शासकीय विभाग यांनी पूर्णपणे नऊ दिवस सहकार्य करून नवरात्र उत्सव पूर्ण शांततामय वातावरणात पार पडला.

यंदा प्रथमच कमला भवानी नवरात्र उत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

नवरात्र उत्सव काळात सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत यांनी योग्य नियोजन केले होते.

नवरात्र उत्सव पार पाडण्यासाठी श्री देवीचामाळ ग्रामपंचायत चे सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दीपक थोरबोले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन चोरमले, ग्रा. प. सदस्य संतोष पवार, अमोल चव्हाण, सचिन शिंदे यांनी चोख नियोजन करून नवरात्र उत्सव शांततेत पार पडला.

त्याबद्दल श्री देवीचामाळ ग्रामपंचायत च्या वतीने सर्व भाविक भक्तांचे जाहीर आभार मानन्यात आले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *