करमाळा प्रतिनिधी

श्री देवीचामाळ येथील श्री कमलाभवानी मंदिरात मंगळवार दि. २४ रोजी विजयादशमी (दसरा) सणाच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी मंदिरात श्री कमलाभवानी मातेची सुवर्णालंकारांसह महापुजा मांडण्यात आली. सायंकाळी ५ वाजता श्री कमलाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्री कमलाभवानी मातेच्या उत्सवमूर्तीची सिंह या वाहनावर खंडोबा मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 

   नवरात्री दरम्यान करमाळा येथील माही डेकोरेटर्सचे मंगेश गोडसे यांनी सलग चौथ्या वर्षी मंदिराला आकर्षक सजावट करून शोभा वाढवली. विशेषतः माही डेकोरेटर्सने उभारलेल्या चांद्रयान मोहीमेचा सेल्फी पॉईंट हा भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरला.

नवरात्रोत्सव आणि दसरा सण पार पाडण्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. ‌प्रदिपकुमार पाटील, डॉ. महेंद्र नगरे, सुशील राठोड यांचेसह बापूराव पुजारी, दादासाहेब पुजारी, विजय पुजारी, तुषार सोरटे, नारायण सोरटे, कमलाकर सोरटे, महेश सोरटे, अभिमान सोरटे, तुकाराम सोरटे, महेश कवादे यांच्यासह पुरोहित सुशील पुराणिक, रविराज पुराणिक, सारंग पुराणिक, मानकरी शिवशंकर फुलारी, बबन दिवटे, राजेंद्र शिंदे, प्रमोद गायकवाड, शिवाजी पकाले, इंताजबी शेख, मनोज जामदार, श्रीकांत गोमे, रमेश माळी, ईश्वर पवार, पद्माकर सुर्यपुजारी, दिनेश पवार, राहूल सिध्देश्वर सोरटे, योगेश सोरटे, प्रकाश सोरटे, सचिन सोरटे, सागर सोरटे, सतीश अनभुले, केतन जगताप, बापू भोसले, अमोल चव्हाण, भाऊसाहेब फुलारी, व्यवस्थापक अशोक घाटे, सौरभ शास्त्री, लक्ष्मण हवालदार इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *