करमाळा प्रतिनिधी

शिवरायांचा जयजय कार करत, जेऊर मध्ये प्रथमच निघाली श्री दुर्गामाता दौड.

      जेऊर मधील मंगळवार हनुमान चालीसा ग्रुप व बजरंग दल, जेऊर च्या वतीने या दौड चे आयोजन करण्यात आले होते. 

    शिवरायांचा जयजय कार व धार्मिक गीत गात बरोबर सकाळी 6.30 ला दौड सुरू होऊन जेऊर मधील मेन रोड, सराफ गल्ली, बाजारतळ, लव्हे रोड पउतका देवी, सुतार नेट जय भवानी मंडळ येथून जेऊर ग्रामदैवत श्री म्हाळसाकांत मंदिर मध्ये आरती करून दौड ची सांगता करण्यात आली.

दौड साठी मंगळवार चालीसा ग्रुप व बजरंग दल जेऊर चे सदस्य दादासाहेब थोरात, प्रदीप पवार सर, पवन कोठारी, दादासाहेब सूर्यवंशी, संजय नाना साळी, सचिन निमगिरे, सुभाष शिरस्कर, प्रतिज्ञ दूनाखे, रवीकिरण माळवे, माधव सूर्यवंशी तसेच खास या दौड साठी करमाळा मधील संग्राम दयाळ, संकेत दयाळ, कृष्णा माने, अॅड. प्रियाल अगरवाल तसेच शेटफळ मधील सतेश लबडे, गोपाळ पाटील, विठ्ठल रोंगे, गणेश पोळ हे शिवभक्त सामील झाले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *