
करमाळा प्रतिनिधी
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची करमाळा येथे प्रमुख मान्यवरांशी घेतली सदिच्छा भेट व विविध विषयांवर चर्चा केली होती. यावेळी आदिनाथचे मा. व्हा. चेअरमन रमेश कांबळे, मा. संचालक डॉ. हरिदास केवारे, मा. संचालक पोपट सरडे, कमलाई

नगरीचे संपादक जयंत दळवी, समता परिषदेचे दिलीप भुजबळ, कोळेकर मामा, सरपंच बिनवडे, रासपचे अध्यक्ष अंगद देवकते आदिजण उपस्थित होते.

……
यावेळी देशातील राजकीय माहिती युत्या आघाडी बाबत तसेच तालुक्यातील साखर कारखान्यांची तसेच शेतकरी हिताचे निर्णय आदी बाबतीत चर्चा जानकर यांनी दिली आहे.

राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो त्याप्रमाणे मी माझा पक्ष वाढवण्यासाठी कोणत्याही पक्षासोबत जाण्याची शक्यता नाकारत नाही. सध्या तरी आपण कोणावरही नाराज नाही. आपण लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे रासपचे प्रमुख माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. आ. पडवळकर हे पवारांना टार्गेट करतात. यावरही बोलताना ते म्हणाले, पवारांनी धनगर समाजाचे काय वाईट केले नाही. त्यांना अधिक खालच्या भाषेत बोलणे चुकीचे आहे. असे सांगत पवारांची पाठराखण केली.
माजी मंत्री जानकारी सोमवारी करमाळा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते, इतर ठिकाणी काम चांगले असेल तरी करमाळ्यात मात्र पक्षाच्या कामावर खुश नसल्याने पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. करमाळा तालुक्यात पक्षाचे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
आमच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा आहे. सगळ्या राज्यात काही ना काही योगदान आहे. महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या तुलनेत आमचे चांगले काम आहे. गुजरात मध्येही आमचे 28 नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर लढत आहोत. त्याशिवाय भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही चोर आहेत. कारण चांगल्या कामाला नावे ठेवणे किंवा थांबवणे चुकीचे आहे. दोन्ही पक्ष तसेच करतात. कायम चांगल्या कामांना थांबतात. येणाऱ्या काळात आपणही या चोर म्हणालेल्या पक्षासोबत जाणार का ? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट सत्ता मिळत असेल आणि आम्ही काही चांगले करत असु तर आम्हाला पाठिंबा घ्यायला हरकत नसल्याचे म्हणाले.
पवारांच्या भेटीवरून लोकसभेच्या चर्चा सुरू झाल्या पण ती एक साधी भेट होती. तो विषय पुढे वाढवणे चुकीचे आहे. आपले त्यांच्यासोबत भांडणही नाही.