
करमाळा प्रतिनिधी
मकाई सह. साखर कारखाना या कारखान्याने गेल्या ऊस गळीत हंगामा ची बिले अद्याप दिलेली नसल्याने शेतकरी मेटकुटी ला आलेला आहे. ऊस नेऊन दहा ते अकरा महिने झाले आहेत. शेतकऱ्यांचे महत्वाचे सण पोळा, महालक्ष्मी, गणपती असे कितीतरी सण गेले. एम. डी. खाटमोडे जबाबदार अधिकारी फोन उचलत नाहीत. आता दिवाळीचा सण तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे अजून मिळत नसतील तर अमरण उपोषण हाच पर्याय असल्याचे गायकवाड यांनी सांगितलं आहे.

येत्या 30 तारखेपर्यंत जर ही बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत तर आपण श्री आदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे 31/10/2023 पासून अमरण उपोषण करणार असून माझे उपोषण दरम्यान काही बरे वाईट झाल्यास त्यास संपूर्ण मकाई चे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ हे जबाबदार असणार आहेत अश्या अशयाचे निवेदन आज तहसीलदार यांना देण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या संचालक मंडळी ना डेड लाईन 30 आक्टोबर आहे. अन्यथा 31 आक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आदिनाथ मंदिर संगोबा येथे अमरण उपोषण सुरु करणार आहे.

यावेळी बहुजन आघाडी चे राजाभाऊ कदम, व ग्रामस्थ उपस्थित होते.
