करमाळा प्रतिनिधी

 कैलास सत्यार्थ चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली, महात्मा फुले समाज सेवा मंडळ करमाळा, अभिनव भारत समाजसेवा  मंडळ सालसे तसेच नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे यांच्या संयुक्त विद्यमानाने 16 ऑक्टोबर 2023 रोजी बालविवाह मुक्त भारत अभियान हा सामाजिक उपक्रम नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे येथे राबवण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रामहरी घाडगे सर आणि चैतन्य चौधरी यांनी बालविवाह मुक्त याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना बालविवाह ही मोठी गंभीर समस्या आहे. बालविवाह मुक्त अभियान यशस्वी करताना पालक/ग्रामस्थ वर्गाने लक्ष देणे गरजेचे आहे. देशातील बालविवाह प्रथा नष्ट करणे हा मुख्य हेतू असून बाल विवाहामुळे होणारे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

 आपने समुदाय में बाल विवाह के खिलाफ,सभी कदम उठाने, और इसकी रिपोर्ट करने की, प्रतिज्ञा करता हुं, ताकी, यह सुनिश्चित किया जा सके, की, मेरे पडोस और समुदाय में,किसी भी बच्चे का, विवाह न हो l 

मैं बच्चो की शिक्षा, और बाल श्रम, और बाल शोषण सहित, किसी भी प्रकार के, शोषण और दूरव्यवहार से, सुरक्षा के लिए भी, अपनी आवाज उठाऊंगाl

 यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, कर्मचारी बालविवाह मुक्त भारत अभियानात सहभागी होण्यासाठी शपथ घेऊन तसेच अभियानाला गती देण्यासाठी या अभियानाचे शपथपत्र भरून दिली.

 सुरक्षित बचपन सुरक्षित भारत

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *