करमाळा प्रतिनिधी
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या आदेशाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. आदिनाथ ला पैसा कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची हित डोळ्यापुढे ठेवून अशासकीय संचालकांनी काम करून प्राध्यापक शिवाजीराव सावंत व तानाजीराव सावंत यांचा विश्वास सार्थ करावा असे आव्हान माढा पंचायत समितीचे माजी सदस्य व युवा नेते पृथ्वीराज सावंत यांनी केले.

2018 19 मधील ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रति टन 90 रुपये प्रमाणे जवळपास अडीच कोटी रुपयांची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आदिनाथ कडे बाकी होती. ही रक्कम देण्याचा निर्णय प्रशासक मंडळांनी घेतला असून शेतकऱ्यांच्या घामाचा दाम देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास आदिनाथ चे प्रशासकीय मंडळ अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे व्यक्त केला. 28 व्या बॉयलर प्रदीपन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांच्या सुविद्य पत्नीसह विधिवत होम हवन करून आदिनाथ ला भवितव्य प्राप्त होण्यासाठी बॉयलर पूजा करण्यात आली. यावेळी आदिनाथ चे माझी वाईस चेअरमन रमेश कांबळे, माझी संचालक हरिदास केवारे, प्राध्यापक रामदास झोळ, प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, शेतकरी संघटनेचे नेते सरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावर्षी आदिनाथ कारखाना चार लाख तर उसाची गाळप उद्दिष्ट समोर ठेवून काम करीत आहे. यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, सन 2018-19 मधील शेतकऱ्यांच्या घामाने पिकवलेल्या उसाची रक्कम अद्याप मागील संचालक मंडळांनी दिली नव्हती. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा दिला पाहिजे. या भूमिकेतून कारखान्यात शिल्लक असलेली साडेपाच हजार पोते साखर विकून ही शेतकऱ्यांना रक्कम देण्यात येणार आहे. येणाऱ्या तीन वर्षाचा आराखडा कारखान्याचा तयार असून लवकरच कारखान्याची विस्तारीकरण व डिसलरी इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
बोलताना संजय गुटाळ म्हणाले की, तालुक्यातील साखर कारखान्यापेक्षा 51 रुपये दर जास्तीचा आदिनाथ देणार असून ऊस उत्पादकांना काटा पेमेंट वाहतूकदारांना बोनस तात्काळ पेमेंट या बाबी कटाक्षाने पाळल्या जाणार आहेत. कार्यकारी संचालक अरुण बागनोर यांनी आभार मानले.
………………………..
प्राध्यापक रामदास झोळ
सन 2018-19 मधील एफ.आर.पी. चे प्रतिष्ठान प्रमाणे राहिलेली रक्कम शेतकरी विसरून गेले होते. मागील संचालक मंडळांनी उत्पादकांच्या घामाचा पैसा जवळपास बुडवला होता. प्रशासकीय मंडळांनी पाच वर्षांपूर्वीचे देणे देण्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय मंडळाचे अजून विश्वासहर्ता वाढणार आहे असा विश्वास प्राध्यापक रामदास झोळ यांनी व्यक्त केला.
……………………………
पृथ्वीराज सावंत
दोन-तीन दिवसात आदिनाथ कर्मचाऱ्यांचा एक पगार करण्याचे नियोजन केले असून ती रक्कम लवकरच आदिनाथ च्या खात्यावर वर्ग करणार असून यावर्षी आदिनाथच्या कामगारांनी अत्यंत काटकसरीने केवळ दीड कोटी रुपयात कारखान्याची सर्व कामे ओळखल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा आभारी असून सर्व खाते प्रमुखांचा चार लाख तर उसाचे गाळप झाले तर मी स्वतःहून सत्कार करेल.