
युती धर्म न पाळता व अर्धवट माहितीनुसार शिवसेनेचे महेश चिवटे यांनी चुकीचे वक्तव्य करू नये – भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार
करमाळा प्रतिनिधी
मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी पक्ष वाढीसाठी व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव प्रत्येक निवडणूक ही कमळावर लढवण्याचा प्रयत्न करू अशी आशा व्यक्त केली होती. परंतु युतीचा धर्म न पाळता व अर्धवट माहितीनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी चुकीचे व बेजबाबदार वक्तव्य केल्याचे दिसून येते असे मत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी नुकतेच प्रसिद्धी पत्रकार द्वारे व्यक्त केले.

भाजपा पक्षात नेहमीच राजकीय शिस्त पाळली जाते व आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनातूनच पक्षाचे काम करत असतो आणि पक्ष वाढीसाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार योग्य मध्य गाठून योग्य ते निर्णय घेत असतो. आमच्या पक्षाचे काम कसे करावे हे आम्हाला दुसऱ्यांनी शिकवू नये त्यांनी त्यांच्याच पक्षातील बाहेरची सोडा करमाळ्यातील गटबाजी कड लक्ष द्यावे व आपली प्रसिद्धी कामातून दाखवावी न कि बेताल वक्तव्यावरून कालच्या पत्रकार परिषदेत केवळ कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी आपण सर्व निवडणुका कमळ चिन्हावर लढण्याचा प्रयत्न करू व तसे मी आपल्या वरिष्ठांना विचारून त्यांच्या आदेशानुसार काम करू असे आश्वासन दिले .

लोकसभा उमेदवाराचे बोलायचे झाले तर आम्ही त्याचे उत्तर आमच्या कामातून व मताधिक्यातून देऊ. असे धमकी वजा इशारे युतीतील पक्षांनी देऊ नयेत. या वक्तव्याचे स्पष्टीकरण आम्ही त्यांच्याच वरिष्ठांकडून मागणार आहोत व त्यांना युती धर्म पाळण्याची समज देण्याचे सुचविणार आहोत असेही मत जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी व्यक्त केले आहे.