
करमाळा प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भारत सरकार च्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेड यांच्या वतीने खास दसरा सण व दिवाळी सणा निमीत्त

नागरिकांसाठी मागेल त्याला ६० रु. किलो या सवलतीच्या दरात भारत डाळ च्या नावाने एक आधार कार्ड वर ५ किलो हरभरा डाळ विक्री केली जाणार आहे. तरी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार

समितीचे नूतन संचालक व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी केले आहे. दि. १२ आक्टोबर रोजी त्यांच्या हस्ते मार्केटयार्ड करमाळा येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा बाजार समितीचे नुतन संचालक शंभुराजे जगताप, महादेव कामटे, मनोज पितळे, विकीशेठ मंडलेचा, विलास जाधव, सोनूशेठ वीर, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर व सर्व कर्मचारी वृंद, सचिन शिंदे,
नाना मोरे, पंकज (बापु) वीर, आदी उपस्थित होते.