
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 14 ऑकटोबर 2023 रोजी विट येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. जेष्ठ कार्यकर्ते यानी दीप प्रज्वलन

केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते बबन कांबळे, उपसरपंच समाधान कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका महा सचिव नंदू कांबळे सर यांनी आपली मनोगते मांडली. यावेळी ग्रा. सदस्य विकास कांबळे, मामा कांबळे, रायचंद धाकतोडे, भैरवनाथ

धाकतोडे, रामभाऊ कांबळे, बंटी गाडे, मनोज कांबळे, आकाश कांबळे, बालू धाकतोडे, अमोल धाकतोडे, बाळू धाकतोडे, तालुका संघटक बाळू कांबळे, प्रेमचंद कांबळे सर, शिव शाहू फुल आंबेडकर विचारमंच बबन कांबळे, रोहिदास कांबळे, आदी कार्यकर्ते व महिला लहान मंडळी, तरूण मंडळी उपस्थितांपैकी होती, सर्वांनी बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर सर्वांनी भोजनदानाचा आस्वाद घेतला. सर्व कार्यक्रम शांतपणे पार पडला. कार्यक्रम सूत्र संचालन नंदू कांबळे सर यांनी केले.