
करमाळा प्रतिनिधी
आजपासून शारदीय नवरात्र महोत्सव सुरुवात होत आहे. करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मातेचा उत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवात करमाळा तालुक्यासह बाहेरील राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तांची आई कमालभवानी च्या दर्शनासाठी रीघ लागलेली असते. या नऊ दिवसात अनेक भाविक भक्त पहाटे पासूनच चालत दर्शनासाठी येत असतात.

सध्या प्रशासनाकडून IDBI बँक ते श्रीदेवीचा माळ या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातील काही भाग पूर्ण झालेला आहे. सदरील रस्ता चांगला झाल्यामुळे या रस्त्यावर वाहने प्रचंड वेगाने येतात. त्यामुळे आतापर्यंत खूप लहान मोठे अपघात झालेले आहे.

परंतु तयार झालेल्या रस्त्यावर वाहतुक नियमाचे कोणतेही फलक तसेच वेगाने जाणाऱ्या वाहनांना चा वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक ची आवश्यकता आहे अन्यथा एखादी मोठी घटना घडू शकते तसेच या रस्त्यावर iDBI बँक समोरील नाल्यावर संरक्षक कठडे नसल्यामुळे देखील अपघात घडू शकतो तरी प्रशासनाने त्वरित या गोष्टीची दखल घेऊन नवीन रस्त्यावर गतिरोधक, पुलाला संरक्षक कठडे आणि ज्या भागातील रस्त्याचे काम बाकी आहे तेथील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केली आहे.