सोलापूर दि. 14(जि.मा.का.):- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील दिनांक 15 व 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

   रविवार, दि .15 ऑक्टोबर 2023 रोजी  सायंकाळी 06.00 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन राखीव. सायं. 07.00 वा.शासकीय विश्रामगृह येथे नागरीकांच्या भेटीसाठी राखीव . विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम.

                सोमवार, दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 08.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने तुळजापूर रोड कडे प्रयाण व  सकाळी 08.50 वा. ग्रामदैवत रूपाभवानी मंदिर येथे देवी दर्शनासाठी राखीव. सकाळी 09.15 वा. श्री श्री बसावारुढ महास्वामीजी मठास सदिच्छा भेटी साठी राखीव. (स्थळ नयी जिंदगी, कस्तुरबा नगर विमानतळाच्या मागे सोलापूर). सकाळी 11.00 वा. नियोजन भवन येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना आढावा -जिल्हा परिषद यंत्रणेच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ सभागृह क्र.2 नियोजन भवन) . दुपारी 12.30 वा.जिल्हा वार्षिक आढावा-महानगरपालिका व नगर पालिका यंत्रणेच्या बैठकीस उपस्थिती (स्थळ-सभागृह क्र.2 नियोजन भवन) , दुपारी 01.30 वा.सुधारीत पंढरपूर विकास आराखडा आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ-सभागृह क्र.2 नियोजन भवन) , दुपारी 02.30 वा. जिल्हा वार्षिक योजना आढावा – राज्यस्तरीय यंत्रणा बैठकीस उपस्थिती.(स्थळ-सभागृह क्र.2 नियोजन भवन), दुपारी 04.00 वा. उजनी प्रकल्प आढावा बैठकीस उपस्थिती स्थळ- सभागृह क्र.2 नियोजन भवन), दुपारी 04.30 वा. सोलापूर महानगरपालिका  येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती स्थळ – इंद्रभुवन, रेल्वे लाईन्स सोलापूर.

    सायं. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव . रात्री 10.00 शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने सोलापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. 10.15 वा. रेल्वे स्थानक येथे आगमन व रात्रौ 10.30 वा. सोलापूर रेल्वे स्थानक येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *