सोलापूर ,13 (जिमाका):-  समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. या कायद्याच्या जनजागृती प्रचार-प्रसार कार्यक्रमाची प्रभावी  अंमलबजावणी करण्यासाठी ७ अशासकीय सदस्यांची  नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक व्यक्तींनी दिनांक ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

                या जिल्हास्तरीय समितीवर सात अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून यामध्ये दोन महिला सदस्य, एक  जिल्हा समन्वयक  म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्तींनी  शैक्षणिक पात्रता, जादूटोणा विरोधी कायद्याबाबत घेतलेले प्रशिक्षण, जादूटोणा विरोधी कायद्याबाबत केलेले विशेष कार्य,  चारित्र्य प्रमाणपत्र आदी कागदपत्राबरोबर वैयक्तिक तपशिलासह अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे सादर करावेत.

 इच्छुकांनी विहित कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. चौगुले यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *