
करमाळा प्रतिनिधी
श्री साई इंटरप्राईजेस या एजन्सीला राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंतर्गत गाव जिंती तालुका करमाळा येथे काम सुरू करण्याची परवानगी दिलेली होती. सर्व काम हे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सूचना व

निर्देशनानुसार पार पडणे आवश्यक होते. या योजनेच्या संबंधित कागदपत्रांप्रमाणे संपूर्ण कामासाठी एकूण 87 लाख इतकी रक्कम मंजूर व वर्ग करण्यात आले व वेळोवेळी ते सदर श्री साई इंटरप्राईजेस एजन्सीने वेळोवेळी अंदाजे 84 लाख इतके रक्कम खर्चही केली असा खर्च झालेला दाखविला असला तरी या स्कीमला पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत तरी आजपर्यंत त्यातून जिंती ग्रामस्थांना पाणी मिळू शकलेले नाही. त्याची चौकशी करावी अशी मागणी नितीन राजे भोसले यांनी तहसीलदार करमाळा यांना केले आहे.