करमाळा प्रतिनिधी

बँकेने महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय क्र. युआरबी-1823/ प्र.क्र.367/7-स.दि. 03 ऑक्टोंबर 2023 रोजी जाहीर केलेली दि करमाळा अर्बन को-ऑप. बँक लि. करमाळा या बँकेची विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजनेची अंमलबजावणी शुक्रवार दि.

13/10/2023 पासून सुरू झालेली आहे. सदर योजनेनुसार कर्ज आणि उत्पादक झाल्यानंतर द.सा.द.शे. 7 % दराने तडजोडीच्या दिनांकापर्यंत व्याज घेतले जाईल. सदर तडजोडीची रक्कम एक रक्कमी भरणा केल्यास कर्ज अनुत्पादक

झाल्यानंतर द.सा.द.शे. 6 % दराने तडजोडीच्या दिनांकापर्यंत व्याज घेतले जाईल. सदरची योजना कर्जदारांच्या हिताची असून ही योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत असेल. त्यानंतर जादा व्याजदराची योजना अमलात येणार असल्याने या योजनेचा सर्व थकीत कर्जदारांनी लाभ घ्यावा. सदर योजनेचा लाभ न घेतल्यास संबंधित थकीत कर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्व थकीत कर्जदारांनी नोंद घ्यावी.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *