करमाळा प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे पदाधिकारी जाहीर झाले आहेत. सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे अभिषेक आव्हाड यांची निवड जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण

यांनी अभिषेक आव्हाड यांची निवड जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नूतन जिल्हाध्यक्ष आव्हाड यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला. नूतन जिल्हाध्यक्ष

अभिषेक आव्हाड हे गेला तेरा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे प्रामाणिकपणाने काम करत आले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पक्षाचे प्रामाणिकपणाने काम केल्याने व कोणताही वशिला न लावता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अभिषेक आव्हाड यांची सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी निवड केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *