करमाळा प्रतिनिधी 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ  यांना करमाळा तहसील पुरवठा विभागातील गैर कारभाराबाबत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. करमाळा

तालुक्याला तहसीलदार नसल्यामुळे तहसील ऑफिस मधील पुरवठा विभागामध्ये रेशन कार्डधारकांना एक एक वर्षापासून रेशन कार्ड मिळत नाही. रेशन कार्ड मध्ये नाव दाखल करण्यासाठी व नाव कमी करण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे.

दलाला मार्फत म्हणलं की आठ दिवसात रेशन मिळत आहे. परंतु लाभार्थी जर गेला तर सर्वर डाऊन आहे. या आठ दिवसांनी या अशा थापा मारल्या जात आहे आणि पैसे दिले की आठ दिवसात रेशन कार्ड मिळत आहे. अशी तक्रार मंत्री महोदयांकडे केलेली आहे. त्यांनी आश्वासित केले की, करमाळा पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. “आंधळ दळतंय, कुत्र पीठ खातय’” अशा पद्धतीचे करमाळा तालुक्यातील जनतेची अवस्था झालेली आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बनकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे बार्शी तालुकाध्यक्ष दीपक ढगे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, विनायक गानबोटे, आधीचं पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *