
करमाळा प्रतिनिधी
मंगेशजी चिवटे ऑक्सीजन पार्क अंर्तगत झरे येथील नामदेवराव जगताप विद्यालयांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक झाड भेट देण्याचा कार्यक्रम आमच्या दादाश्री फाउंडेशन च्या माध्यमातून आयोजित करण्यात

आला होता. या कार्यक्रमासाठी मंगेशजी चिवटे (मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी), मुंबईमध्ये गोरगरिबांसाठी कॅशलेस म्हणजे निशुल्क 2000 बेडचे हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर संचित पॉल (रत्ननिधी ट्रस्टचे सीईओ),

आमदार पुत्र युवा उद्योजक सुगंध चंद्रीकापुरे, योगेश जानकर (लोकप्रिय नगरसेवक ठाणे), गौतमजी जगदाळे (वित्त व लेखा अधिकारी सोलापूर), शिवाजीराव बंडगर सर (सभापती कृषी उत्पादन बाजार समिती करमाळा) बंडूशेठ गोपने (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळ), युवा नेते संतोष ढेरे, अशोक ढेरे, दादाश्री फाउंडेशनचे माधव जाधव, दादाश्री फाउंडेशनचे मार्गदर्शक दिगंबर (तात्या) चोपडे, युवा उद्योजक अशोक शेठ चोपडे, गणेशजी चव्हाण (पत्रकार आणी मंगेशजी चिवटे यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असणारे), झरे हायस्कूलचे मुख्याध्यापक घाडगे सर, विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. आयोजक म्हणूण दादाश्री फाऊंडेशनचे काका काकडे यांनी योग्य नियोजन केले.