
करमाळा प्रतिनिधी
रयत क्रांती पक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला आदर्श मानून शेतकरी मजूर कामगार व इतर समाज घटकांच्या हक्कासाठी काम करीत आहे. या कार्यात सहभाग व योगदान ठरण्यासाठी कंदर तालुका करमाळा येथील राजकुमार

सरडे यांची नुकतीच रयत क्रांती पक्षाच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड झाली. ही निवड रयत क्रांती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भानुदास सुरेश शिंदे यांच्या पत्राद्वारे करण्यात आली. यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
