
करमाळा प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे मॅडम व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अर्जुननगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या

जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत एक तास स्वच्छतेसाठी या माध्यमातून बस स्थानक परिसर मारुती मंदिर समोर, विविध चौकात गावातील महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने

गावात विविध स्वच्छता कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमात गावातील वाढलेले गाजर गवत प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सरपंच चंद्रकला भोगे, माजी सरपंच अश्विनी थोरात, माजी सरपंच अनिल

थोरात, कमलाई शुगरचे संचालक समाधान भोगे, माजी उपसरपंच भारत हांडे, आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक आजिनाथ घाडगे, ग्रामसेवक मनोज लटके, आशा सेविका प्रेमा भोगे, ग्रामपंचायतचे सचिन रोकडे, केशव घाडगे, जयराम आतकरे, रोजगार सेवक भारत हांडे, गावातील महिला बचत गटाचे सदस्य व ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.