
करमाळा प्रतिनिधी
शुक्रावरी दोन इसम हे करमाळा शहरातील कर्जत रोडवरील पाण्याची टाकी जवळ Troikaa कंपनीच्या MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP या नावाचे एकूण २० बॉक्समधील एकुण १०० बाटल्या प्रति बॉटल ३३४.४०/- रु प्रमाणे एकुण ३३,४४०/- रु. व TERMIVA कंपनीच्या MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP या नावाचे एकूण ५० बाटल्या प्रति बॉटल ३१३.८७/- रु प्रमाणे एकुण १५,६९३/-रु. असा एकुण ४९,१३३/-रु किंमतीचे हे “परिशिष्ठ एच” प्रवर्गात मोडत असल्याने

ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशन व्दारेच विक्री करणे बंधनकारक आहे. सदरची औषधे डॉक्टरांचे चिठ्ठी शिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसतांना, व त्याचे खरेदी बिल नसताना अवैद्य मार्गाने प्राप्त करुन अशा औषधाचे वापरामुळे स्वास्थास / जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे तसेच त्यातील विषारी द्राव्याचे दुष्परीणाम होवून इंजेक्शन घेणारे व्यक्तीचे जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर दुखापत होवू शकते हे माहीत असताना नमुद इंजेक्शन अवैधरीत्या प्राप्त करुन गैरवापर करण्याच्या उददेशाने अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरीता १,६०,०००/-रु किंमतीची बुलेट मोटारसायकल वरून घेवुन जाताना मिळून आला म्हणुन वगैरे मजकुरचा गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाची रणजित माने पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांना व गोसावी, दहिहांडे, रंदिल व शेरखाने असे पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी कर्जत रोडवरील पाण्याची टाकी जवळ, करमाळा येथे रवाना करून सदर पथक हे साध्या वेशात जावून सदर घटनेच्या अनुषंगाने त्या इसमांवर पाळत ठेवून सदर पथकांनी प्रतिबंधित इजेक्शन विक्री करीत असलेल्या दोन इमसांना जागीच मुददेमालासह पकडुन त्यांचेकडे सदर मिळालेल्या प्रतिबंधित इजेंक्शनबाबत चौकशी करून त्यास सदरचे इंजेक्शन कोणाकडुन विकत घेतले आहे याबाबत चौकशी केली असता सदर पथकास एका इसमाकडुन विकत घेतली असल्याची माहिती मिळाल्याने सदरबाबत रणजित माने यांनी सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

…………………….
करमाळा शहरातील तसेच ग्रामीण भागातील तरुणांना तसेच जीममध्ये व्यायाम करणा-या तरूणांना करमाळा पोलीस ठाणेकडुन आवाहन करण्यात येते की, तुम्ही ताप्तुरती चांगली शरीरयष्टी बनविण्यासाठी अशा प्रकारचे नशाचे इंजेक्शनचा वापर करण्याऐवजी तुम्ही नैसगित समतोल आहार आणि योग्य व्यायाम करून शरीर यष्टी कमविली पाहिजे. तीच शरीर यष्टी आयुष्यभर टिकेल. सदरील इंजेक्शनाने तात्पुरता फायदा मिळेल, पंरतु तुमच्या शरीरातील हृदय, किडनी अशा अनेक शारीरिक अवयवांवर कायमचा विकार होवुन एखादा गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे. तसेच सदर इंजेक्शनचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी जास्त प्रमाण झाल्यास त्यामध्ये मृत्यु होवु शकतो. तसेच आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करीत आहोत की, अशा प्रकारच्या नशेचे इंजेक्शन हे कोणी विकत असल्यास तात्काळ आम्हांस कळवावे. आपली नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
