जेऊर प्रतिनिधी

इस्लाम धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक जणांसाठी आजचा दिवस पवित्र आहे. ईद मिलाद उन नबी म्हणजेच भाईचारा इन्सानियत या विचारांची पाळेमुळे घट्ट करणारा दिवस हे ईद मिलाद उन नबी म्हणजेच भाईचारा इन्सानियत या विचारांची

पाळेमुळे घट्ट करणारा दिवस असून मुस्लिम बांधव व सर्वांनाच या दिवसाबद्दल आदर आहे असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. जेऊर ता. करमाळा येथे ईद मिलाद उन नबी अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या

उत्साहात साजरी करण्यात आली. माजी आमदार नारायण पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती अतुल पाटील, सरपंच भारत साळवे, माजी सरपंच भास्कर कांडेकर, राजूशेठ गादीया, उपसरपंच धनंजय शिरसकर, उपसरपंच अंगद गोडसे, सदस्य नागेश झांजूर्णे, संदीप कोठारी, शांताराम सुतार, बापू घाडगे, योगेश करणवर, संतोष वाघमोडे, राजू लोंढे, राजू जगताप, हनुमंत विटकर, परमेश्वर पाटील, नवीन दोशी, संपत राठोड, भारत महाविद्यालय प्राचार्य अनंत शिंगाडे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, आनंद मोरे, सुयोग दोशी यश विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध संघटना संबधित मान्यवर उपस्थित होते.

 करमाळा, आवाटी, कंदर, रोपळे येथील मुस्लिम समाजाने आयोजित सर्व कार्यक्रमांना माजी आमदार पाटील हे वेळ काढून उपस्थित राहत असून सामाजिक सलोखा जपण्याचे काम करत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *