
उपळवटे ग्रामपंचायत जाणुन बूजुण करत आहे का दुर्लक्ष – अक्षय भैय्या देवडकर
करमाळा प्रतिनिधी
गावातील हायमास्ट दिवे कित्येक दिवस झाले बंद पडले आहेत तरी ग्रामपंचायत लक्ष देयला तयार नाही जय बजरंग चौकातील दिवा, चांभार वाड्यातील दिवा, मारुती मंदिरासमोरील दिवा, दत्त गल्लीतील दिवा, पंक्यावरील दिवा एकुण पाच दिवे बंद आहेत. मंदिर परिसरात ही दिवे बंद असल्याने अंधार आहे.

त्यातील काही दिवे जलजीवनची पाईप लाईन नेत आसताना त्याच्या वायरी तुटल्याने बंद पडले आहेत तरी ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांना वावरत असताना गैरसोय होत आहे.

लोंढे वस्तीवरील रस्ता मंजुर होता पण वस्तीतील काही नागरिक आडवे येत असल्याने ग्रामपंचायतीने तो रस्ता मंजुर असुण केला नाही पण आम्ही तो स्वखरचातुन केला होता पण जलजीवनची पाईप लाईन गेल्याने रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने लहान, थोर, शालेय विद्यार्थी यांची जा ये करता असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गैरसोय होत आहे रस्त्यावर खड्डे पडल्याने पाउसामुळे त्या खड्यात पाणी साचल्याने नागरिकांना ये जा करत आसताना खड्यात गाडी जाउण पडली नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.

मोरया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अक्षय भैय्या देवडकर यांनी सरपंच राहुल घाडगे यांना रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत, पाउसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने लहान, थोर, शालेय विद्यार्थी, वयस्कर माणसे यांना येता जाता येत नाही असे सागितले आसता सरपंच राहुल घाडगे यांनी दोण दिवसात करु असे सागितले होते. पण दहा दिवस उलटुण गेले तरी रस्त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे रस्त्याविषयी अक्षय देवडकर यांना सरपंच राहुल घाडगे यांना सागितले आसता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप अक्षय देवडकर यांना केला आहे. लहान, थोर, शालेय विद्यार्थी, वयस्कर माणसे येत जात आसतात. पुढे चालुन लहान, थोर, शालेय विद्यार्थी, वयस्कर माणसे याच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे तर सदर परिस्थितीची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा वयस्कर माणसांच्या जिवीताची जबाबदारी ग्रामपंचायतीची आसेल तरी ग्रामपंचायत सरपंचाने त्याकडे दुर्लक्ष न करता त्या रस्त्यावरील खड्डे बुजुण तो व्यवस्थित करुण द्यावा व हायमास्ट दिवे चालु करावेत.
अन्यथा उपळवटे ग्रामपंचायतीच्या विरोधात आवाज उठवु.
अक्षय भैय्या देवडकर (मोरया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व जनशक्ती संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष)