करमाळा प्रतिनिधी

चंद्रयान-३ चे यश संपूर्ण जगासाठी एक निराळी पर्वणीच होती. G-20 च्या उत्कृष्ट आयोजनानंतर भारताचे जगभरातून कौतुक होत आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी संवाद साधताना व्यक्त केले.

करमाळा शहरातील वार्ड क्रमांक 87 येथेही कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळेस भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य दीपक चव्हाण, सोलापूर जिल्हा चिटणीस श्याम सिंधी, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, अखिल भारतीय ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, संजय गांधी निराधार योजने चे नरेंद्रसिह ठाकुर, किसन मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, पत्रकार दिनेश मडके, जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेचे संचालक शिवनाथ घोलप, सोशल मीडियाचे नितीन कांबळे, गणेश क्षीरसागर, आदी जण उपस्थित होते.  भारतीयांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, चंद्रयान तीन च्या बाबतीत बोलायचे झाल्यास इस्त्रोच्या यूट्यूब लाइव चैनल चा लाभ 80 लाखा पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला.

याबाबत प्रत्येकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या जी-20 परिषदेनंतर पर्यटन क्षेत्रामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. देशाची संस्कृती, परंपरा, वास्तुशिल्प याबाबत इतर सर्व देशातील प्रतिनिधींना माहिती घेण्यामध्ये कुतहलता दिसून आली.

विश्व पर्यटन दिवस म्हणून 27 सप्टेंबर हा दिन साजरा केला जातो. पर्यटनाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास कमी गुंतवणुकीमध्ये जास्त रोजगार हा पर्यटन क्षेत्रात दिसून येतो. अनेक दुर्लक्षित साईट दिवसेंदिवस प्रकाश झोतात येत आहेत. सद्य परिस्थितीमध्ये 42 वर्ल्ड साईट म्हणून संबोधल्या जातात तसेच कर्नाटक येथील होइसला मंदिरास युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज सूचीमध्ये सामील केले असून तेराव्या शतकामधील शिल्परचनेबाबत आर्किटेकचर ला दाद मिळत आहे.

हा देश गुणीजनांचा देश आहे. यामुळेच इतर देशातील बांधवांनाही आपल्या देशाकडून जास्त अपेक्षा आहेत. पुढील काळात युवकांनीही संस्कृतीबरोबरच विज्ञानाची कास धरून देशाच्या जडणघडणीचे साक्षीदार व्हावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयावर भारतीयांशी संवाद साधला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *