करमाळा प्रतिनिधी
दोस्तांनो गल्ली पासुन दिल्ली पर्यंत जी सध्याचं 5 जी राजकारण होतयं त्याचं नेटवर्क आता करमाळ्या पर्यंत पोहोचलयं म्हणायचं!…. बाजार समितीची निवडणुक व्हतीयं का, राजकारणाचा बाजार झालायं ही काय कळाया मार्ग नाही… अकलुज च्या वाड्यावर काल सगळीच मैफील दिसली , काल परवापर्यंत एकमेकाची डोकी फोडणारी आणि एकमेकाच्या औलादी काढणारी पौलादी मंडळीनी आपआपल्या पोरास्नी या बाजारात आणायचा मनसुबा आखलाय. तिकडं अकलुज च्या वाड्यावर करमाळ्याचा बाजार भरलाय आणि हिकडं निमगावात शिंदेच्या वाड्यावर साखर वाटपाचा कार्यक्रम चालु , किती योगायोग आहे…

कायच कळाना , पण सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र कालपासूनच म्हणत्यात , आयला पाऊस बी पडाना आन् हिकड इलेक्शन बी घडाना…🥲…..त्यात मतलबी राजकारणातले हतबल नेते… आपआपला स्वाभिमान गिळुन भविष्यातल्या स्वार्थासाठी एकत्र बाजारात आली. मग ठरलं एकदाचं… बाजारात दुकानं आपल्याच लेकराना थाटुन दयायची , माल कुणाचा का खपाना…😂 फायदा मात्र आपल्यालाच आला पाहिजे,
मागल्या निवडणुकीत भांडाण झालं, राडा झाला ,डोकी फुटली, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार मंडळी आत बसली. लई नुकसान झालं… त्यात सर्व सामान्य शेतकऱ्याचा पोरगा बंड करून पाच वर्षे चेअरमन पदावरन हालला नाहय… मग तुला ना मला घाल…….? कशाला, म्हणुन ही सारी मंडळी अकलुज च्या वाड्यावर दिसली. ही गोष्ट खरी हाय!

करमाळा तालुक्याचे मात्तबर नेते इतके हतबल …का आणि कशासाठी झाले ? राजकारण स्वार्थाच झालयं हे खरचं… देश दुनिया सुधारली, प्रगती झाली पण करमाळा तालुकयाचा कायापालट कधीच झाला नाही कारण आपल्या नेत्यांची काया बदलली.. पण करमाळ्याचा कॅलिफोर्निया कधीच झाला नाही.
जिथं नेतृत्वच सक्षम नसतील तिथं प्रगती अशक्यच!
करमाळ्यात वाढ झाली एका गटाचे दोन गट झाले, दोनाचे मग चार पाच झाले, तुम्ही आम्ही पण मग गावकुसाचे राजकारण करत करत ह्या गटातुन त्या गटात आणि त्या गटातुन हया गटात उड्या मारत बसलोय.. आणि नेत्यांसाठी कार्यकर्ते आपापसात भांडत बसतेत,. वेळप्रसंगी हाणामाऱ्या करतात. परंतु काही नेतेमंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी / आमदारकी साठी कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून द्यायला मागेपुढे पहात नाहीत. हे वास्तव नाकारता येणार नाही.
एक म्हण प्रचलित हाय… हाताची पाची बोटं सारखी नसत्यात, पण खाताना ती एकत्रच येत्यात.. तसंच झालयं करमाळ्याच्या राजकारणात..!
नेमकी ही मंडळी एवढी हतबल का झाली? मतलबासाठी का करमाळ्याच्या विकासासाठी…?
२०२४ चे मनसुबे आखुन ज्याचा त्याला डाव खेळायचाय, विद्यमान आमदारांना वाटतयं बिनशर्त पाठिंबा दिला की भाऊचा हात आपल्याला… अकलुज वाल्यांना वाटतय लोकसभेत जायला ही तिघं बी मदतीला धावत्याल… आणि तिघा बी माजींना कापरं फुटलयं निमगावकर रोखलं नाहय तर सगळ्याचीच दुकानदारी बंद व्हईल म्हणुन..
अकलुज करांना वाटतयं आपुन सक्सेस , पण चाणाक्ष निमगावकरांनी सुद्धा तीन्ही गडी एकाच घरात पाठवल्यात बिनशर्त पाठिंब्यावर… पुढचा गेम तर लयं मोठा हाय… २०२४ ला काय व्हईल ते व्हईल तोपर्यंत बाजारात आप आपल्या पोरांची दुकानं तर थाटून घेण्यासाठी नटुन अकलुज च्या वाड्यावर गेलेल्या सर्वांनाच शुभेच्छा.!…विकासाच्या मुद्दयावर विकासकामांसाठी देखील ही अशीच एकत्र राहोत. तसेच नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद, आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि विधानसभा या निवडणुका सुद्धा बिनविरोध व्हावीत यासाठी पण एकत्र राहोत ही गणेशाला प्रार्थना! कोणाला पटल नाहय पटल … पण बाजार समितीच्या निवडणुकीत करमाळ्याच्या हतबल राजकारणाचा बाजार झालायं हे मात्र खरयं!—-
- तिरंदाज केमकर