रंभापुरा गल्लीचा आदर्श इतरांनी घ्यावा – मंगेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी

रंभापुरा तरुण मंडळाचे सर्व सदस्य निर्व्यसनी असून स्वतः उद्योग धंदे करून स्वतःच्या कष्टाच्या पैशावर स्वाभिमानाने उपजीविका करतात. एकमेकांना मदत करण्याची भावना ठेवतात याचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा असे आवाहन  मुख्यमंत्री

वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आवाहन केले. मित्र मंडळाचे अध्यक्ष व युवा नेते भा.ज.प.चे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, युवा नेते अरुण काका जगताप, ग्रामपंचायत सदस्य अशोक चव्हाण उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष बापू तांबे, उपाध्यक्ष संभाजी राजे, खजिनदार संतोष करंडे, अशोक करंडे, बळीराम दुधाट, संतोष ठाणे, निलेश चव्हाण, अमित बुद्रुक, विष्णू गोळे, ज्योतीराम गाणे, संजय टेकाळे, संतोष गोळे, भैय्या गोडसे, दत्तात्रय गणेश झोळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

आगामी काळात गणेशोत्सवाचे निमित्ताने भव्य आरोग्य शिबिर घेणार असल्याचे रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण यांनी जाहीर केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *