
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने शंभूराजे जगताप यांनी केले रक्तदान
करमाळा प्रतिनिधी
श्रेष्ठदान … रक्तदान …. सामाजिक बांधिलकी जपत देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भा.ज.पा. युवा मोर्चा, सोलापूर ग्रामीणच्या वतीने करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या पुढाकाराने तब्बल १२२ रक्तदात्यांनी मौजे केम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर

येथे आज केले रक्तदान …. गरजवंत पेशंट्ससाठी निश्चीतच एक हात मदतीचा देण्याचा हा एक विधायक अन् आदर्श उपक्रम म्हणावे लागेल …. शंभूराजे अन् केम करांनी ठेवलेला हा आदर्श इतरही पक्ष अन् सामाजिक संघटनांसाठी पथदर्शी व आदर्शवत ठरलेला आहे. या शिबीराचे उद्घाटन केम गावातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते व केम ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख उपस्थिती म्हणून भा.ज.पा. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप हे होते. यावेळी सागरराजे दोंड, विष्णू दादा पारखे, दिलीप नाना दोंड, तानाजी नाना दोंड, आनंद शिंदे, कांतीलाल दोंड, बाळासाहेब देवकर, गोरख नाना तळेकर, विलास

बिचितकर, किरण तळेकर, दयानंद तळेकर, बापू घाडगे, रघुनाथ सावंत, गणेश आबा तळेकर, बाळासाहेब तळेकर, धनंजय ताकमोगे, विकास कळसाईत, निलेश तळेकर, राजेश दुर्गूळे, संतोष गलांडे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते .