करमाळा प्रतिनिधी

सुमारे 400 वर्षांपूर्वी राजेवर्षांपूर्वी राजेराव रंभा निंबाळकर यांनी उभेे केलेले श्री कमलाभवानी मंदिराच्या दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामास अंदाजे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नुकतेच हे काम हाती घेतल्याचे श्री कमलाभवानी देवी

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी सांगितले. रायगड किल्ल्याचे संवर्धन करीत असल्याच्या एजन्सीला कमलाभवानी मंदिराचे काम देण्यात आले आहे.‌‌‍‍‍ यामध्ये शिखराच्या दुरुस्तीसह रंगरंगोटी करणे, मंदिराला मूळ स्वरूपात

आणणे, गोपूरावर टाकलेले अतिरिक्त वजनाचे स्लॅब काढून टाकणे, तिन्ही डिकमली डंबरी व सर्व प्रवेशद्वाराचे चुन्याने मजबुतीकरण करणे, आदी कामांचा समावेश आहे. पूर्ण झाल्यानंतर 400 वर्षांपूर्वी ज्या मुळ स्वरूपात मंदिर होते तशा पद्धतीने

हे मंदिर पाहण्यास मिळणार आहे. श्री कमला भवानी मंदिर ट्रस्टला देण्यात येणारी मदत ही आयकर खात्याचा 80 नुसार करमुक्त आहे. श्री कमलाभवानी भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *