
करमाळ्यातील घारीचा पावन गणपती
करमाळा प्रतिनिधी
जुनी करमाळा नगरपालिकेत घारीचा पावन गणपती आहे. सदरची मूर्ती स्वयंभू असून जुने करमाळा नगरपालिकेचे बांधकाम करीत असताना ही मूर्ती मिळाली. 1867 पूर्वीची आहे असे बोलले जाते. स्थापना राजे रावरंभा यांच्या कालखंडात झालेली आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी गणेशोत्सव साजरी करत आहे. श्रीगणेशाची अथर्व सूक्त येथे पाठ पठण केले जाते. करमाळ्यातील श्री कमलाभवानी देवीचा पाठोपाठ या घारिचा पावन गणपतीचे फार मोठे अधिष्ठान आहे.

संकष्ट चतुर्थी, गणेश चतुर्थी या दिवशी अनेक भाविक भक्त हजारांच्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतात व आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात. गणेशोत्सवाच्या काळात सकाळ-संध्याकाळ गणेशाची आरती पाठ नियमित होते. तसेच अनंत

चतुर्थी दिवशी श्रीदेवीचा माळावरील राजेराव रंभा जगदंबा देवस्थान यांच्यावतीने हत्तीवरून मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन होते. सदर गणपती नवसास पावन आहे असे बोलले जाते. त्यामुळे या घारीच्या गणपती शेजारी अजून एक विसर्जनासाठी येथे गणपती दुसरा आणला जातो व दोन्ही गणपतींचे पूजा विधिवत गणेशोत्सव काळात केली जाते. सदर हा गणपती मानाचा असून कित्येक वर्षापासून करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी गणेशोत्सव साजरी करत आहे. करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी गणेश मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. मंदिराची इमारत जुनी असुन त्याची मोठ्या प्रमाणात बांधकाम होऊन सुसज्ज व्हावी असे इच्छा भाविकांची आहे.